Taapsee Pannu Replace by Deepika Padukone for to play role of Amrita Pritam in Sahir Ludhianvi Biopic
Taapsee Pannu Replace by Deepika Padukone for to play role of Amrita Pritam in Sahir Ludhianvi Biopic 
मनोरंजन

साहिर लुधियानवी यांच्या बायोपिकमध्ये तापसी नव्हे तर दीपिका करेल 'ही' भूमिका

सकाळवृत्तसेवा

संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात आपली प्रमुख भूमिका असावी यासाठी कित्येक कलाकार धडपडत असतात. भन्साळी यांच्या चित्रपटात काम करण्यास अभिनेत्री तापसी पन्नू हिचे नशीब फळफळले. पण तिचा आनंद जास्त काळ टिकू शकलेला नाही. कारण आता या चित्रपटात तापसी ऐवजी दीपिका पदुकोण हिचे नाव फायनल करण्यात आले आहे.

अमृता प्रीतम आणि साहिर लुधियानवी यांच्या प्रेमकथेवर आधारित चित्रपट भन्साळी घेऊन येत आहेत. सूत्रांच्या माहितानुसार, चित्रपट निर्माते अमृता आणि साहिर यांच्या भूमिकांसाठी कलाकारांच्या शोधात होते. त्यासाठी अभिषेक बच्चन आणि तापसी पन्नू यांची निवडही करण्यात आली. पण आता मात्र तापसी ऐवजी दीपिकाला अमृता यांची भूमिका करण्यास ऑफर करण्यात आले आहे. 

सलमान खान, दीपिका आणि आलिया भट्ट यांच्या 'ईन्शाल्ला' या चित्रपटाचा भाग होणार नसल्याने आणि दीपिकासोबत पुन्हा एकदा काम करायची ईच्छा असल्याने भन्साळी यांनी हा निर्णय घेतला असल्याचे समजते. यापूर्वी अमृता यांच्या भूमिकेसाठी ऐश्वर्या राय बच्चन आणि तापसी पन्नू यांच्या नावाची चर्चा होती. अभिषेक आणि दीपिकाने 2014 ला 'हॅपी न्यू इयर' चित्रपटात एकत्र काम केले होते. आता पाच वर्षांनी ते चित्रपटात पुन्हा एकत्र दिसतील. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आठ ते दहा घरांचे नुकसान

Loksabha election 2024 : ''जेव्हा माझी पंतप्रधान पदासाठी घोषणा झाली तेव्हा मी रायगडावर आलो अन्...'' मोदींनी साताऱ्यात सांगितली आठवण

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

IPL 2024, KKR vs DC Live Score: ऋषभ पंतने जिंकला टॉस! पृथ्वी शॉ-स्टार्कचं पुनरागमन, जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

SCROLL FOR NEXT